तापी काठावरील मालखेडा ता. चोपडा येथील धर्मेंद्र सुकलाल पाटील हे आमचे कलीग अनिल हिम्मत पाटील (हिंगोणा) हल्ली मुक्काम अंकलेश्वर यांचे शालक...
त्यांचे अकाली केवळ 35व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुले( 3 वर्षाची मुलगी, आणि 1 वर्षांचा मुलगा), बहीण असा परिवार आहे.
अत्यन्त शोकाकुल वातावरणात नातलग, मित्र परिवार, हितचिंतक याचे उपस्थितीत धर्मेंद्र यास भडाग्नी देतांना सर्वांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
अनिल हिम्मत पाटील, साळुंके परिवार, भदाणे परिवार, अमळनेरB येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार, मालखेडा पंचक्रोशीतील परिजन या वेळी उपस्थित होते.
पुरोगामी मित्र परिवाराच्या सहवेदना.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments