पूनम बापूराव ठाकरे स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित

पत्रकारिता व सामाजिक कार्याबद्दल अमळनेर येथिल पूनम ठाकरे यांचा गौरव.
नासिक येथील दर्पणकार बाळशास्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. महेंद्र देशपांडे यांनी अमळनेर येथील शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमास लिना बनसोडे (व्यवस्थापकीय संचालक, अदिवासी विकास मंडळ, नासिक), मनीषा खत्री(आयुक्त मनपा नासिक), डॉ. जानकी नाईक (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्राहक रक्षक समिती), माया काळे (उद्योजिका नाशिक), पूजा कदम. कविता राऊत (ऑलम्पिक धावपटू नाशिक), स्वाती भामरे, नितल शितोळे- सरकार, अभिनेत्री संगीता गायकवाड आदी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. शिवमती पुनम बापूराव ठाकरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शिवमती पुनम बापूराव ठाकरे या अंमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक तथा शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पत्रकार ,मराठा सेवा संघाचे सचिव शिवश्री बापूराव आनंदराव ठाकरे पाटील यांच्या पत्नी असून त्यांना हा पुरस्कार पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी दिला गेला.
अमळनेर पंचक्रोशीत सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार

Post a Comment

0 Comments