चुंचाळे येथील शेतकरीपुत्र आता न्यायदान करणार!

नगरदेवळा पंचक्रोशीत ऋषिकेश पाटील यांचे अभिनंदन! 
नगरदेवळा जवळील चुंचाळे येथील सामान्य शेतकरी पुत्र असलेला ऋषिकेश सुनील पाटील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत 52 क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 
ऋषिकेश यास त्याचे काका ऍड. आर के पाटील व ऍड. गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले..  ऋषिकेश पाटील नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार विद्यालयाचा विद्यार्थी असून पनवेल येथील बि. सी. टी विधी महाविद्यालयात त्याने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 
सामान्य कुटुंबातील ऋषिकेश पाटील न्यायाधीश झाल्याने त्यांचे पाचोरा पंचक्रोशीत कौतुक होत आहे! 
न्यायाधीश ऋषिकेश, लोकहितवादी परिवाराचे संजय सोनार (लोकमत प्रतिनधी), ऍड सारांश सोनार, निर्भय सोनार यांचे वतीने आपले अभिनंदन. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments