शिंदखेडा, धुळे, अमळनेर व जळगाव एस टी डेपो व्यवस्थापकांशी काँग्रेस नेते संदीपराजे घोरपडे व काँग्रेस पदाधिकारी यांनी संपर्क करून पर्यायी मार्ग काढायची विनंती केली व त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.
गावा-गावातील खाजगी वाहने देखील यावेळेस तत्परतेने धावून आलेत व त्यांनी फक्त एका बाजूचे भाडे घेऊनच प्रवाशांना आपापल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.
कोणत्याही प्रशासकीय पदावर नसताना संदीप घोरपडे व काँग्रेस कार्यकर्ते या अडचणीत धावून आले या कडे कुणाचेच लक्ष नाही याचे वाईट वाटते.
प्रसिद्धी माध्यमांनी या लोकांची दखल घेतली पाहिजे.
अमळनेर रेल्वे अपघात झाल्याने जळगाव अमळनेर सह हजारो प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचे पुण्यकर्म काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व संदीपराजे घोरपडे यांनी केले.
डेपो मॅनेजर योगेश शिवदे यांनी तात्काळ प्रतिसाद देत जादा बसेस सोडल्या. त्यांचे देखील कौतुक करून आभार मानायला हवे.
नुसते मिरवायचे नाही तर प्रत्यक्ष काम करायचे हा धडा घोरपडे व काँग्रेस टीम ने घालून दिला.
सुखरूप पोचलेल्या प्रवासी माता भगिनी व नागरिकांनी आभार व्यक्त केले.
खासदार नाहीत, आमदार नाहीत, प्रशासकीय अधिकारी नाहीत पण समयसूचकता दाखवून विविध बस डेपोला फोन करून लोकांची सेवा करणारे अमळनेर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना धन्यवाद.
*ही जाहिरात किंवा पेड न्यूज नव्हे!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments