अमळनेर रेल्वे स्थानकावर दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी मालगाडीचे ७ डब्बे पट्ट्यावरून खाली घसरल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खासदार मा. स्मिताताई वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मदत व पुनर्बांधणी कार्याची पाहणी केली.
या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले असून, रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
खासदार स्मिताताईंनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे. अपघातग्रस्त पट्ट्यावर रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments