अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचा अपघात झाला असल्याची माहिती सध्या मुंबईत असलेले माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांना कळताच त्यांनी रेल्वेचे स्थानिक व भुसावळ विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य करण्याच्या सुचना केल्या, तसेच आपल्या काही कार्यकर्त्याना तात्काळ घटनास्थळी पाठवून संपूर्ण अपडेट जाणून घेतले.
जिल्ह्यातील दोघे खासदार महिला आहेत त्यांचे आधीच माजी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घातले..
या ठिकाणी कामगारांना कोणत्याही बाबीची गरज भासल्यास संपूर्ण मदतीची तयारी त्यांनी दाखविली.
या अपघातामुळे इतर प्रवासी गाड्या जागीच थांबून प्रवाश्यांचे हाल होत असल्याने तातडीने वाहतूक सुरळीत करण्याचीही विनंती आ. अनिल पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली.
तसेच या कामी युद्धपातळीवर काम करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचे आमदार पाटील यांनी कौतुक करत जनतेच्या वतीने आभार देखील व्यक्त केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments