असे महान विचार मांडणारे आदर्श संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांच्या जयंती निमित्त अखंड भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी भीमा भोई महाराज यांचा प्रतिमे समोर नतमस्तक होऊन त्रिवार वंदन करून पूजन केले.
महान ज्ञानी, महान कवी, महान प्रज्ञावंत, महानत्यागी, महान धर्मगुरू अशा अनेक उपाधी लावून घोषणा देण्यात आल्या.
अंधश्रद्धावर कडाडून हल्ला करणारे, कुप्रथा विरुद्ध प्रबोधन करणारे संत भीमा भोई यांचे आदर्श विचार प्रत्येकाने अंगीकारावे असे आदर्श विचार जर डोक्यात रुजले तर आदर्श व्यक्तिमत्व घडतं या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी समस्त भोई समाजाचे महिला मंडळ, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, वयस्कर नागरिक असे सर्वजण उपस्थित होते
कार्यक्रम आनंदाने व आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments