पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या स्मरणार्थ शिवसेनेतर्फे दि. २१ मे, २०२५ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता तिरंगा चौक ते महाराणा प्रताप चौक पर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तिरंगा रॅलीत चारचाकी वाहनावर भारत मातेची एक प्रतिमा, मोटारसायकलवर तिरंगा झेंडा लावून रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते गायिले जाणार आहेत.
सदर तिरंगा रॅलीमध्ये सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments