सारेच वाळू उपसा बद्दल तुटून पडले आहेत, अद्याप हप्ता मिळाला नाही की काय?

प्रशासन अनेकदा 'चूप व चूक' असतेच पण पत्रकारही वर्षभर 'चूप' होते !
हप्ता लेट झाल्याने ही ओरड तर होत नाही ना? अशी शँका आहे!! काही अपवाद आहेतच हे नक्की!
आमचे व्हाट्सअप वर रीतसर लेखी भूमिका मांडत एका तटस्थ माणसाने आमचे या कडे लक्ष वेधले... आणि मलाच लाज वाटली.. हे सत्य आहे.. मी मान्य केले.
हप्ता वगैरे काही नसते बाबा, एखादे पाकीट मिळते वर्षातून त्यातही आमचे अध्यक्ष फिद्यक्ष वगैरे 5 चे असेल तर दीड दोनच अगदी इमानदारीने बोलावून किंवा घरपोच देतात.. त्यांना नक्की मानसी किती मिळतात हे देव जाणे!
पण वाळू उपसा हा विषय आम्हा माध्यम जगताने अगदीच अंगावर घेतलेला दिसत आहे.. या वरून वाळू उपसा किती भयंकर विषय आहे याची जाणीव होऊ लागली आहे.
ही बातमी करू का असे सरकारी पत्रकारास विचारले तर तो 'हितचिंतक' मला म्हणाला की कशाला फुकटचे दीड दोन हजार बुडवतोय? जाऊ दे ना!
मी म्हटले की खरेच प्रामाणिक पणे गौण खनिज चोरी बद्दल भांडत असाल तर मी सोबत आहे, नाहीतर अशा दीड दोन हजारावर मुततो मी!!
तो हितचिंतक मला सॉरी म्हणून निघून गेला..
दुसरीकडे 'पाकिटे' पॅकिंग सुरू असल्याचे समजले.. २ तीन गट असल्याने एका प्रस्थापित गटाला तीन लाख( विभागून) दुसऱ्या गटाला 2 लाख व तीसऱ्या गटाला 50 हजार असे नियोजन असल्याचे समजते.
मध्यस्ती करणारे नेहमीचे एक दोघे व वाळू माफिया यांच्यात चर्चेच्या फैरी झडत आहेत, अधून मधून 'मद्य' रात्री वाटाघाटी होत आहेत..
अपेक्षा पूर्ण होई पर्यंत जोरदार मागे लागा असा त्यांचे 'फर्जंद' यांना आदेशही निघाले आहेत म्हणे! म्हणून चोहीकडून वाळू माफीया व प्रशासन विरोधात जोरदार मोहीम सुरू झाली असे दिसते. ही मला माझे पण काही हितचिंतक व सच्चे मित्र आहेत त्यांनी दिली त्या वरून हे वृत्त करीत आहे.
आम्ही मात्र बधणार नाहीत.. जे सत्य ते ते मांडतच राहू..
'सत्य असत्याशी नाही केली ग्वाही!
मानियेलें नाही बहुमता!!'
ह्या न्यायानेच आम्ही मार्गक्रमण करू!
वाळू माफियांना संरक्षण देणारे राजकीय नेते, प्रशासनातील काही चोर, व चमचेगीरी करणारे भुरटे यांचे बद्दल आम्ही लिहितच राहू, लढत राहू.
ज्यांनी पाकिटे मिळावित म्हणून चर्चा व दबाव तंत्र अवलंबिले आहे त्यांचे फायनल अपडेट देखील आम्हास कळेल.. ते आमच्या वाचकांना नक्की सांगू.
पाऊस अजून दमदार झाला नाही त्या आधी मिळेल ती वाळू उपसून साठा करण्याची लगबग सर्वच माफियांची आहे, त्यांना महसूल मधील काही तर राजकीय अनेकांचा आशीर्वाद आहे पण आम्हा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना अचानक पर्यावरणाचे प्रेम का दाटून आले हा शोधाचा विषय असल्याचे हितचिंतकाने कळवून चक्क आमची कान उघाडणीच केली.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments