अनेक ग्रामसेवक वाळू धंद्यात असून महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी 'वाळू माफिया' किंवा 'सरकारी कामात भागीदार' असल्याचे प्रतिक्षदर्शी लोकांनी लोकहितवादीला सांगितले.
'ते' नातलग वा पंटर सोबत थेट भागीदार असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही..
हे खरे असेल तर,
वाळू माफिया विरुद्ध कारवाई करताना हे 'पडद्या मागील चोर' प्रशासनास का सापडत नाहीत? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेक सरकारी बांधकामात देखील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची भागीदारी असल्याचे सर्व विदित आहे.
त्यांच्या 'मद्य' रात्री होणाऱ्या बैठका हा उत्तम पुरावा आहे. या सर्वांचे मोबाईल CDR रेकॉर्ड तपासले तरी आमची बातमी खरी आहे हे सिद्ध होईल.. पुरावे द्यायची गरज पडणार नाही.
प्रशासकीय उच्च पदस्थ अधिकारी कारवाई करणार का? हा सवाल या निमित्ताने करीत आहोत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments