प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके मोजत ठाव घेत कधी हृदयात शिरतात हे कळण्या आधी ते आपल्या हृदयात स्थिरावलेले असतात... हा अनुभव..
साहित्य संमेलनात प्रतापचे प्रांगणात ऍड. सारांश सोनार यांचे कडे असलेले मोठ्या रकमेचे पाकीट गहाळ झाल्याने सारांशदादा यांचे भान हरवले होते.. कितीही प्रामाणिक असलो तरी इतक्या मोठ्या रकमे बद्दल संशयाची सुई आपल्याकडेच येईल अशी नेमकी भीती असताना डॉ अविनाश जोशी यांनी ऍड. सारांश यांना आश्वस्त करून सांगितले की,
'बेटा, तू असे करूच शकत नाही.. नाही मिळाले पाकीट तर मी पदरमोड करून रक्कम भरेल, तू फक्त टेन्शन सोड व कार्यक्रमावर फोकस कर!'
मलाही फोन आला.. पण सारांश मात्र बेचैनच होता..
आणि cctv कामी आला, पाकीट चोर सापडला... पाकीट मिळाले.. तणाव निवळला... ऍड सारांश सोनार यांनी उत्तम सूत्रसंचलन केले!
डॉ अविनाश जोशी असे व्यक्ती ओळखणारे व धीर देणारे तज्ञ आहेत याचा प्रत्यय या निमित्ताने आला .
अनेकांना जीवदान देणारे डॉ अविनाश जोशी यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा.
लव्ह यु अविनाशजी!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजय सोनार
7972871440

0 Comments