सुरक्षित व नैसर्गिक कुंकू उत्पादनात कृषिभूषण पाटील यांना यश!

आधी केले, राबले योगदान दिले व यश मिळवले!!
जळगांव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील राजवडला सिंदूरचा यशस्वी प्रयोग!
आदर्श गाव राजवड येथील राज  फार्मवर 15 ऑगस्ट, 2023 रोजी 35 सिंदूर रोपांची यशस्वी लागवड केली गेली, साधारणपणे सिंदूर चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून 3 वर्षाचा कालावधी जावा लागतो. पण कृषीक्षेत्रात योजनाबद्ध शेती कामात बहुमोल कार्य केल्यामुळे लागवड केल्यापासून अवघ्या 15 महिन्यातच प्रती वृक्ष 1 किलोप्रमाणे 35 किलो सिंदूरचे प्रथम उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
सिंदूर झाडावर लालसर रंगाची फळे (गुच्छ) येतात. फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात. या बिया नैसर्गिकरीत्या गळद लालसर रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे सुरक्षित असते. बियांना सावलीत सुकवून त्यांची  बारीक लालसर पावडर तयार केली जाते. हेच पावडर नैसर्गिक कुंकू म्हणून वापरले जाते.
सिंदूर चा उपयोग... 
 हिंदू संस्कृतीत महिलांसाठी मांग भरणीसाठी (सौभाग्य लेणं) सिंदूर वापरले जाते. नैसर्गिक खाद्य रंग म्हणून पदार्थ रंगविण्यासाठीही सिंदूर चा वापर केला जातो. त्वचेसाठी उपयुक्त असल्यामुळे औषधी आणि सौंदर्य प्रसादनातही वापर होतो. धार्मिक विधीसाठीही उपयुक्त असून हे कुंकू बाजारातील रासायनिक कुंकूपेक्षा अधिक सुरक्षित आणि शुद्ध असते.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी अथक प्रयत्न करून 'ऑपरेशन सिंधुर' हा प्रयोग यशस्वी करून दाखवला त्या बद्दल कृषी क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments