या विषयावर पदवी मिळाली.
त्यांच्या phd चा विषय "Social and Religious Reform movements in India during Freedom Struggle" असा असून स्वातंत्र्य काळात महिला आणि अस्पृश्य यांच्या संदर्भात अस्तित्वात असलेल्या वाईट रुढी, परंपरांच्या विरोधात विविध संस्थानी, समाज सुधारकांनी केलेल्या चळवळीचा इतिहास मांडण्यात आला आहे.
प्राचीन काळापासून महिलांच्या संदर्भात विविध अनिष्ट प्रथा अस्तित्वात होत्या. एक मानवी जीव म्हणून त्यांचा हक्क नाकारण्यात आला होता. अश्या परिस्थितीत राजा राम मोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ईश्र्वरचंद्र विद्यासागर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज इ. समाज सुधारकांनी वेगवेगळ्या पद्धतीने, मार्गांनी महिला आणि अस्पृश्य यांची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.
यासाठी शिक्षण आवश्यक आहे हे समजल्यावर महिला आणि अस्पृश्य यांच्या शिक्षणाला सुरुवात केली. हा सर्व इतिहास ह्या थेसिस मध्ये मांडण्यात आला आहे. आजही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची, मार्गाची नितांत आवश्यकता असून आजही महिलांवरील अत्याचार कमी झाले नाहीत आणि जाती व्यवस्थेच्या उत्तरंडीच्या अन्यायाचे थोडे स्वरूप बदलले आहे.
प्रा. साळुंके यांनी ही पीएचडी ची पदवी मालवांचल विद्यापीठ इंदोर येथून पूर्ण केली. रिसर्च गाईड म्हणून डॉ. देविदास राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. साळुंके यांच्या ह्या यशात त्यांचे दिवंगत पती कै. राजेंद्र साळुंके यांचे आशीर्वाद, आई सौ. ठगुबाई दाभाडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य, दोन्ही मुली आणि जावई यांचे सहकार्य, बहीण ॲड निशा चव्हाण आणि भाऊ श्री सतीश दाभाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. प्राचार्य, प्रशासन अधिकारी , प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
प्रा दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
जयश्री, तुला खूप प्रेम आशीर्वाद व भावी वाटचालीस शुभेच्छा.. लव्ह यु बाळा!!
-राष्ट्र सेवादल, छात्रभारती, अनिस व पुरोगामी परिवार.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments