आणि अशा रीतीने झाला प्रतापच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा!

 माजी चेअरमन डॉ अनिल शिंदे व प्रदीप अग्रवाल यांचे हस्ते बक्षीस प्रदान!
प्रदीप अग्रवाल यांनी मिटवला हा दुरावा!
अमळनेर प्रताप महाविद्यालयात  यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा उशिरा का असेना मात्र उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.  
संख्याशास्त्र विभागातील  तीन विद्यार्थ्यांनी IIT-JAM   या  राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळविले आहे त्यापैकी( AIR-130 ) मिळविलेल्या अश्विनी अशोक भदाणे या  विद्यार्थ्यांनीची IIT पवई येथे M.Sc Statistics च्या शिक्षणासाठी निवड झाली आहे. तिने GATE परीक्षेतही AIR-228 मिळवून दुहेरी यश संपादन केले आहे. याच विभागातील  लीना दिलीप शिरसाट (AIR-398)  हिचा देखील सत्कार करण्यात आला. लीना ही प्रताप महाविद्यालयातील कर्मचारी दिलीप शिरसाठ यांची कन्या आहे. त्याचबरोबर विद्यार्थी दुर्गेश पाटील याने देखील IIT-JAM परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
       तसेच JEE-Advance 2025 या  परीक्षेत AIR OBC -4050 मिळवणाऱ्या वेदांत मांटे या विद्यार्थ्याचाही गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे या सोहळ्यात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलाखत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या निर्भय धनंजय सोनार या विद्यार्थ्याचाही विशेष सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या कालावधीत (दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2024) साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या होत्या, ज्यात निर्भयने आपले पत्रकारिता संवाद कौशल्य दाखवून प्रथम क्रमांक पटकावला होता.
या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण झाली असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष  निरज अग्रवाल, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील,  प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, प्रा. जे. बी. जैन, प्रा सुनिल पाटील, प्रा. उमेश येवले, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments