खाशी परिवरातून बाहेर फेकले गेलेले बिपीन पाटील पुन्हा सक्रिय?

मनमे लडडू फुटा असे तर झाले नाही ना?
अचानक सक्रिय होण्यामागे कोणते सामाजिक हित?
'खाशी' निवडणूक पूर्वतयारी भाग -१ 
बिपीन पाटील हे खानदेश शिक्षण मंडळाचे माजी पदाधिकारी.. आर के परिवारात विनोदभैय्या पाटील, कल्याणबापू पाटील व बिपीन पाटील या तिघांनी खाशी मंडळात संधी मिळवली, मुख्य जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली. 
यात विनोदभैय्या अत्यन्त नम्र स्वभावी, मृदू भाषी व नेतृत्वक्षम असे नेते म्हणून सर्व परिचित आहेत. 
कल्याणबापू पाटील हा विषय पुढच्या एपिसोड मध्ये घेणार आहोतच त्या आधी बिपीन पाटील यांचे काल परवा अचानक आक्रमक होऊन सक्रिय होणे अनेकांच्या भिवया उंचावणारे ठरले. 
मुळात कुणाला कधी नमस्कार न करणारा, आपल्याच गुर्मीत राहणारा हा माणूस अभ्यासू म्हणूनही कधी लोकांना दिसून आला नाही आता अचानक मनात लाडू तर फुटत नाहीत ना? असे खा शि परिवारातील अनेकांनी बोलून दाखविले. 
संभाव्य खाशी निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावायचे हा विचार आल्यानेच बिपीन पाटील यांना अचानक खा शि मतदारांवर होणाऱ्या अन्यायाची, सत्ताधारी लोकांचे विरोधात दंड थोपटून आपण किती जागरूक आहोत हे दाखविण्याची उर्मी दाटून आली.  एरवी इतकी वर्षे त्यांनी ना कुणाला भेटी दिल्या ना खाशी प्रांगणात फिरकले, ना कुणाला नमस्कार केला. 
आता अचानक सक्रिय होणे म्हणजे पुन्हा एकदा खाशी तर खाशी नाही तर भावाना ठेवू उपाशी हेच एकमेव धोरण ठेवून उचललेले पाऊल असल्याचे विरोधक व खा शि परिवारात बोलले जात आहे. 
*बातमीत प्रसिध्द फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.
--------------
कुठे होते बिपीन पाटील इतके दिवस? काय करीत होते? 
भाग-२ उद्या. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments