सहकारात 'भैय्या' 'कल्याण' साधत भावाला पुन्हा शह देणार?



बिपीन पाटील यांची खा शी परिवारातून कायमची सुट्टी होणार? 
खा शी निवडणूक लागेल तेंव्हा लागेल पण पूर्व तयारी सुरू झाली असून विद्यमान संचालक कल्याण पाटील व विनोद भैय्या सहकारात आधीच दाखल झाले असल्याचे चित्र आहे.
यात अनेक वर्षे झोपलेले बिपीन पाटील यांना अचानक जाग आली व ते देखील सक्रिय झाले असल्याने पटेल परिवारातून नक्की कोण पुढे येणार? 
विनोद भैय्या पाटील यांचा सहकार क्षेत्रात मोठा दबदबा आहे हे निर्विवाद सत्य. त्यांचा नम्र स्वभाव हे देखील एक कारण आहे. कल्याण पाटील हे आक्रमक असले तरी खिसा मोकळा करणारा, मित्र परिवारातील लाडका चेहरा म्हणून त्यांनी एक स्वतंत्र इमेज जपली त्या साठीच गत निवडणूक त्यांनी मोठ्या मतांनी जिंकली, 
बिपीन पाटील हे त्यांचेच बंधू पण गर्विष्ठ व कुणालाही नमस्कार न करणारे म्हणून त्यांच्या (सहकार) परिवारात ओळखले जातात. 
5 वर्ष झोपायचे व ऐन वेळी उठून 'यंत्रणा' कामाला लावायची हे प्रकार लोक अलीकडे सहन करीत नाहीत. 
सहकारात विनोद भैय्या व कल्याण पाटील यांचे निवडणूक पूर्व आगमन झाले असल्याची सूत्रांची माहीती आहे,. 
बिपीन पाटील यांची आताच घरवापसी ठरली असल्याचे खाशी परिवारात बोलले जात आहे. या बाबत 
आणखी सविस्तर  परवा भाग -४ मध्ये लिहिणार आहोतच. 
-----------
गोविंद मुंदडा यांनी योगेश, बजरंग अग्रवाल यांनी नीरज, कुंदन अग्रवाल यांनी प्रदीप, असे वारसदार नेमले आता विनोंद भैय्या 'अभिषेक' करणार का?
उद्या भाग -३
*बातमीत प्रसिध्द फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments