आगामी खा शि निवडणुकीत विनोदभैय्या देखील करणार अभिषेक?

बिपीन पाटील यांना शह-काटशह देण्यात कल्याणबापू  पाटील देखील घेणार आघाडी? 
खाशी परिवारात कुंदन अग्रवाल यांनी प्रदीप अग्रवाल यांना बजरंग अग्रवाल यांनी नीरज अग्रवाल यांना तर गोविंद मुंदडा यांनी योगेश मुंदडा यांना पुढे करून दुसऱ्या पिढीला पुढे करून निवृत्ती स्वीकारली.
असेच विनोद भैय्या पाटील देखील खाशी परिवारातून निवृत्त होत अभिषेक करणार असल्याची चर्चा सुरू आहे.  
त्या साठी विद्यमान संचालक कल्याण पाटील यांचेशी जुळवून घेत बिपीन पाटील यांना बाजूला ठेवायची मोर्चे बांधणी सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. 
बिपीन पाटील यांचा स्वभाव व आयत्या वेळी त्यांना येणारी जाग हे देखील कारण मानले जात असल्याचे खा शि परिवारातील जाणकारांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले. 
विनोदभैय्या मृदू स्वभावी व राजकीय धुरीण म्हणून ओळखले जातात, त्यांना कल्याण पाटील यांची साथ मिळाली तर भैय्या या निवडणुकीत निवृत्त होऊन अभिषेक व कल्याण पाटील यांना वारसदार म्हणून सूत्रे सोपवू शकतात. 
यात अडसर ठरू शकतील ते बिपीन पाटील.. पण त्यांची अशीही खाशी मतदारात फार ताकद नसल्याने मोठी अडचण येणार नाही असेही राजकिय सूत्रांचे निरीक्षण आहे. 
-------------------
गत निवडणुकीत कोणत्याही पॅनलने 'स्वीकार' न केलेले मंगलसिंग या वेळी पुन्हा चर्चेत राहणार का? 
भाग-४ उद्या 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments