मुख्यमंत्री फडणवीस हे जवळचे मित्र असले तरी अमळनेर मतदार संघात भाजप उमेदवार असून देखील भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी त्या वेळी घड्याळाकडे बोट दाखवत आपला पराभव केला म्हणून आपण बंडखोरी केली. दुर्दैवाने त्यात अपयश आले
पण आपले पाठीशी जनता असल्याचे गत निवडणूकीत देखील सिद्ध झाले.
आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली काम करणार असून शिवसेनेच्या कामात लक्ष घालणार असल्याचे देखील माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सांगितले.
शिरीषदादा यांच्या प्रस्तावित शिवसेना प्रवेशाने अमळनेर मतदार संघाचे राजकीय गणित बदलणार असून
भाजपा , राष्ट्रवादी (अजित) व शिवसेना (शिंदे) गटातील तीन मातब्बर नेते युती धर्म पाळत एकत्र नांदतील की भविष्यात येणाऱ्या प.स. व न.प. निवडणुकीत आणखी सुंदोपसुंदी होणार? हे लवकरच स्पष्ट होईल!
तूर्तास शिरीषदादा चौधरी यांच्या शिवसेना प्रवेशा बद्दल राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972871440
0 Comments