मुख्याधिकारी साहेब तातडीने कार्यवाही करा!
अमळनेर ताडेपुरा लगतचा टाकरखेडा रस्ता ते मंगळ मंदिर येथे जाणारा ओमकार नगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे,
मंगळ जयंती निमित्ताने तीन दिवस देश विदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या चाळणी झालेल्या रस्त्यावरुन येता जाताना ते अमळनेर नगरपरिषदेची आरती म्हणून जाऊ नये म्हणून युद्ध पातळीवर या रस्त्याचे बांधकाम करावे अशी अपेक्षा केली जात आहे.
मुख्याधिकारी साहेब या कडे लक्ष देतील का? सोबतच ओमकार नगर वसाहत परिसरातील सर्वच रस्ते देखील नवीन जलवाहिनीच्या कामा निमित्ताने खोदून ठेवले आहेत त्या मुळे पायी चालणे देखील अवघड झाले आहे.
साहेब कृपा करून या कडेही लक्ष द्यावे अशी मागणी ओमकार नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments