असा गुलाबराव पुन्हा उभा!
मुलुख मैदानतोफ दिवंगत गुलाबराव बापू आजही उभेच!!
शिंगाडे मोर्चा काढणारे देशातील एकमेव नेते अशी ओळख असलेले साथी गुलाबराव पाटील आज आपल्यात नसले तरी तीन वेळा लाल टोपी घालून महाराष्ट्र विधानसभा गाजविणारे आजही जिवंत आहेत.
ही किमया साधलीय संदीप घोरपडे, हेमकांत पाटील व समाजवादी परिवाराने. बापूंचा वारसा चालवणाऱ्या या परिवाराने सामाजिक जागृती साठी बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ अभिनव उपक्रम राबविला आहे. या निमित्त परखड सत्य मांडणारे निरंजन टकले व आ. बच्चू कडू यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून सामाजिक विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली असून राज्यातील असंख्य तरुण स्पर्धक अमळनेर शहरात दाखल होणार आहेत.
गुलाबराव बापू अशी एकमेव व्यक्ती आहे की जे इंटरवल देऊन सभा घेत. आणि लोक उत्साहाने या सभेला चक्क ३ ते ५ तास उपस्थित रहात. अशा फर्ड्या वक्त्याची आठवण जागविण्यासाठी होणारी ही वक्तृत्व स्पर्धा म्हणजे एक मेजवानी ठरणार आहे.
दि. २४ व २५ ऑगस्टला होणाऱ्या या दिमाखदार विचार पेरणी सोहळ्यात आपली उपस्थिती असेलच अशी आयोजकांना खात्री आहे असे संदीप घोरपडे व हेमकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments