राज्यातील गाव गाड्याच्या प्रश्नावर मंत्री गोरेंना निवेदन.

दत्ता काकडे व सुषमा देसले यांची उपस्थिती.
 ६/८/२०२५रोजी मंत्रालय मुंबई येथे ग्रामविकास मंत्री यांचे दालनात जयकुमार गोरे व ग्रामविकासचे प्रधान सचिव अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली, या बैठकीस सहभागी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मा. दत्ता काकडे (बीड) यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकारी आबासाहेब सोनवणे (अहिल्यानगर), राजाराम पोतनीस (कोल्हापुर), आनंद जाधव, किसन जाधव, (सातारा, जीजाभाउ टेमगिरे(पुणे, ) अश्विनी थोरात (अहिल्यानगर), उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुषमा देसले पाटील (जळगांव), राजमल भागवत (जामनेर), जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर, समाधान बोड़खे, महेंद्र बोरसे, स्वरा पाटील रावेर, प्रियंका जाधव आजरा,  वैशाली रोमन, निकिता रानवड़े, जी एम पाटिल, प्रमोद चौधरी, संदीप पाटिल, कुंडलिक कोहिनकर, मनोहर पोखरकर आदी या बैठकीस हज़र होते, महिला पदाधिकारी यानी मंत्री गोरे यांना राखी बांधून रक्षाबंधनात अडकवून मागण्या पूर्ण करा ही ओवाळणी असा आग्रह धरला. 
या प्रसंगी मंत्री महोदयानी संघटनेच्या  मागन्या मान्य करण्या संदर्भात प्रशासकीय बाबी तपासुन सचिवांना स्पष्ट आदेशित केले, तसेच सरपंच परिषद करित असलेले विधायक कार्याचे कौतुक केले. 
संघटने मार्फ़त दाखल २० मागण्या ज्यात सरपंच भवन निर्मिति, सरपंच-उपसरपंच  मानधन, निधि तसेच घरकुलासाठी गावठान, ग्रामपंचायत हद्द वाढ़वीणे, ग्रामसेवक, तलाठी, लाइनमन, कृषि सहाय्यक याना एकच ग्रामपंचायतीचा प्रभार द्यावा, पंचायत समिति स्तरावर सरपंच यांची मासिक बैठक बीडीओ यांनी आयोजित करावी या व इतर मागणीचे निवेदन देण्यात आले.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments