शरद बाविस्कर...रेषांनी माणसे जोडणारा डॉक्टर !

अमळनेर पंचक्रोशीतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शरद बाविस्कर यांनी आजवर रेखाटली अडीच हजारावर 'व्यक्ती रेखाचित्र!!'
माझे वाढदिवसाचे निमित्ताने डॉ शरद यांनी माझे रेखाचित्र काढले.. इतके तंतोतंत व अगदी बारकावा टीपत डॉक्टरांच्या आत असलेल्या या चित्रकाराने काढलेले हे रेखाचित्र त्यांनी मला भेट देत वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा उद्योजक शेखर पाटील, डॉ.मिलिंद नवसारीकर, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ,. राहुल मुठे उपस्थित होते. 
वैद्यकीय सेवा करतानाच आपल्यातील कलाकार जिवंत ठेवणारा अवलिया म्हणून डॉ शरद बाविस्कर यांची ओळख असून नामवंत लेखक, कवि, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते व अनेक मान्यवरांचे अडीच हाजारावर व्यक्ती चित्र त्यांनी साकारले आहेत.
चित्र रेखाटून सुंदर फ्रेम करून सरप्राईज भेट देणे हा त्यांचा शिरस्ता आहे. मलाही असेच काम आहे भेटूया म्हणत शेखर पाटील यांचे मार्फत निरोप आला आणि डॉ मिलिंद नवसारीकर यांचे दवाखान्यात हा अनोखा वाढदिवस साजरा झाला. 
डॉक्टर, आपल्यातल्या महान चित्रकाराला सलाम. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments