खचून जाणे हा स्वभाव नाही व ज्या कार्यकर्ते, हितचिंतकांनी भरभरून मते टाकून परिश्रम घेतले त्यांना वाऱ्यावर देखील सोडणार नाही.. येत्या जीप/पंस व नगरपालिका निवडणूका पूर्ण ताकदीने लढणार असे शिरीषदादा चौधरी यांनी स्पष्ट केले.
त्या साठी व्यक्तिगत भेटी सुरू असून सर्व सहकारी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करीत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यातील उत्साह कायम असून विधानसभेतील पराभवाने खचून जाणारे लेचेपेचे आम्ही व आमचे कार्यकर्ते नाहीत हे त्यांनी अधोरेखित केले.
ग्रामीण व शहरी भागात पद्धतशीर नियोजन सुरू असून दोन्ही निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याची तयारी केली असल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत. असे शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments