सरपंच नितीन पाटील यांचा पुढाकार!!
अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत आरोग्य स्वच्छता, शिक्षण, वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला. या द्वारे आपल्या गावाच्या विकास कसा करता येतो हे या योजनेचे महत्व ग्रामसभा घेऊन नागरिकांना समजून सांगितानाच वृक्षांचे संगोपन रक्षण व महत्त्व लोकांना पटवून देण्यात आलं.
या वेळी पूर्ण पंचक्रोशीतील ज्या मुला-मुलींनी स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी यश संपादन केले व आपल्या सह गावाचे नाव उज्वल केले अशा विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालकांचे ग्रुप ग्रामपंचायत कडून श्रीफळ व एक झाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
माणसी एक झाड म्हणजे पंचक्रोशीतील जेवढी लोकसंख्या त्याप्रमाणे वृक्ष लावण्यात आले. या उपक्रमास गडखांब ग्रुप ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सरपंच नितीन बापूराव पाटील, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी पुढाकार घेतला.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments