माजी नगरसेवक प्रतापअण्णा साळी यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर!


मुलांनी अर्थात साळी परिवाराच्या युवा उद्योजकांनी केले नियोजन!! 

अमळनेर येथील श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक प्रतापअण्णा छबुलाल साळी (माजी नगरसेवक) यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात गावातील अनेक तरुणांनी, भद्रा प्रतीक समूहाचे कर्मचारी, एस एस मोबाईलचे प्रमोटर तसेच आयडीएफसी फायनान्स फायनान्स चे कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. 
विशेष म्हणजे युवा उद्योजक विकी व मोंटीसाळी यांनी आपल्या वडिलांचे  वाढदिवसानिमित्त स्वतः रक्तदान करून आपल्या मित्रमंडळींना सुद्धा रक्तदाना साठी प्रवृत्त केले. 
साळी परिवाराचे नेहमीच  सामाजिक धार्मिक कामात योगदान असते त्यात नवीन पिढीचे युवा उद्योजक यांनी या शिबिराद्वारे लोकांपर्यंत एक चांगला संदेश पोहोचला. या शिबिराचे सर्वत्र कौतुक व प्रशंसा होत आहे. प्रताप साळी यांना पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, व्यवसायिक, उद्योजक, पत्रकार तसेच सर्व स्तरातील लोकांनी प्रत्यक्ष, फोन व समाज माध्यमाद्वारे शुभेच्छां दिल्या. साळी परिवाराने त्या सर्वांचे आभार मानले आहेत.
                           *जाहिरात 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments