अमळनेर- येथील पियुष वैशाली काशीनाथ चौधरी याने बिएएमएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याचे वडील काशिनाथ चौधरी हे लोकमान्य विद्यालयात विना अनुदान तत्वावर शिक्षण सेवा देत होते. अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या आईवडील यांनी अत्यन्त कष्टाने पियुष यास पाठबळ दिले. संघर्ष करीतच पियुष चौधरी याने हे यश संपादन केले आहे.
पियुष वैशाली काशिनाथ चौधरी हा भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज आणि संशोधन रुग्णालय, बुटीबोरी, नागपूरचा विद्यार्थी होता. त्यास आई वैशाली व वडील काशीनाथ दयाराम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुरुजन, मामा व आजी यांचे आशीर्वाद लाभले म्हणून आपण डॉक्टर बनू शकलो असे नम्रपणे सांगणारा पियुष पुढे इंटर्नशिप करतानाच उच्च शिक्षण देखील घेणार आहे.
डॉ.पियुष वैशाली काशिनाथ चौधरी याचे धनंजय सोनार, चौधरी कुटूंबीय, आप्त स्वकीय, सहकारी मित्र व अमळनेर वैद्यकीय सेवारत डॉक्टरांनी अभिनंदन केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments