आम्हालाही उपलब्ध करून द्या असे डेअरी विकास महामंडळ व शासना आवाहन!!
अमळनेर- तालुक्या सह जिल्ह्यात। शंभर ते दीडशे लिटर दुध देणाऱ्या म्हशी असल्याचे सांगितले तर धक्का बसला असेल ना? पण हे खरे आहे हे थोडा विचार केला तर तुम्हीच मान्य कराल.
शहरात, तालुक्यात व जिल्ह्यात अनेक(असंख्य?) ठिकाणी जे लोक दिडशे ते 200 लिटर दुध विक्री करतात त्यांचा मागोवा घेतला तर त्यांचे कडे एकच म्हैस असल्याची माहिती मिळाली, उर्वरित दूध मी दुसरीकडून घेतो असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही एकमेव म्हैस वर्षभर दूध देतच राहते, गाभण होत नाही! कारण या व्यक्तींचे दूध विक्रीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. आणि दूध देखील घट्ट असते. हे भेसळयुक्त नसेल म्हणजे शुद्ध दूध असेल तर इतके दूध देणाऱ्या या म्हशी शासनाने व डेअरी विकास महामंडळ यांनी सर्वाना उपलब्ध करून दिल्या तर नवी दूध त्क्रांती होईल.
तालुक्यात व जिल्ह्यात भेसळ युक्त दूध विक्री करताना अनेकांवर कारवाई झाली आहे, अद्याप हा प्रकार सुरूच असावा अशी जोरदार शँका आहे. अन्न व औषध प्रशासन मूग गिळून बसले आहे, त्यांनी भेसळ युक्त दूध शोध मोहीम राबवितानाच एक दोन म्हशी असल्यावरही शेकडो लिटर दुध विक्री करणाऱ्या विक्रेत्या लोकांचीही झाडा झडती घेतली पाहिजे अशी लेखी तक्रार करण्यात आली तसेच डेअरी विकास प्राधिकरणास निवेदन देण्यात आले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments