साईट व्हिजिट च्या नावाखाली अधिकारी व कर्मचारींची अनुपस्थिती!!
अमळनेर येथील सुभाष चौकात असलेले जिप बांधकाम उपविभाग व जि प ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे.
अनेकजन कार्यालयीन वेळे आधीच मष्टरवर सह्या करून रफुचक्कर होतात. कार्यालयीन कर्मचारी कधीही ठिकाणावर नसतात, प्रतीक्षा केल्यावर एखादा आला व कारण विचारले तर म्हणतो की, 'इथेच समोर चहा घ्यायला गेलो होतो.'
अधिकारी तर चुकून भेटलेच तर आपण कुठले पुण्य कमावून आलो म्हणून यांचे दर्शन झाले असा अनुभव येतो.
साईट व्हिजिट च्या नावाने नेहमी बाहेर राहणारे हे MB रेकॉर्ड करायला मात्र बिनचूक वेळ काढुन येतात कारण त्या दिवशी लक्ष्मी दर्शन घडणार असते! असा आरोप केला जात आहे.
ज्यांना काम दिले आहे, ज्यांचे बिल काढायचे आहे त्या साठी 'त्यांचे दिले का? यांचे झाले का,? मी किती ऍडजस्ट केले ते पाहून माझी कदर व्हावी असे अगदी कोडवर्ड मध्ये उघडपणे बोलले जाते. तसा व्हीडिओ उपलब्ध आहे.
हालचाल रजिस्टर मागितले तर साहेबांच्या कपाटात आहे असे सांगून इकडे तिकडे बोट दाखवले जाते. वरिष्ठ अधिकारीना फोन लावला तर ते घेत नाहीत किंवा जळगावला मिटिंग सुरू आहे नंतर बोलतो असे उत्तर येते.
एकूणच या ठिकाणी सावळा गोंधळ असून वरिष्ठ अधिकारीच बेशिस्त आहेत तर अन्य अधिकारी व कर्मचारी यांचे काय घेऊन बसलात?
या संदर्भात लोकहितवादीने जळगाव व नाशिक विभागाचे लक्ष वेधले असून कारवाईची मागणी केली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कुठल्या कामाचे काय दर? कोण-कोण कुणाचे पंटर येथे सक्रिय आहेत? याची इत्यंभूत माहिती घेऊन येत आहोत भाग -२ मध्ये!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments