अमळनेर सह कासोदा चाळीसगाव येथे प्रहारची सभा..!
संपूर्ण महाराष्ट्रात अस्मानी संकट असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यात शासनाला अपयश आले आहे हे सांगत महाराष्ट्रभर सभा घेऊन रान पेटविणारे बच्चू कडू यांची अमळनेर येथे सभा होत आहे.
दुपारी अडीच वाजता स्टेट बँके मागील इंदिरा भवन येथे होणाऱ्या सभेत श्री कडू शासनावर घणाघाती प्रहार करतील असे प्रहारच्या सूत्रांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणारे शिवराम पाटील हे देखील या सभेस संबोधित करणार आहेत.
सभेची जोरदार तयारी झाली असून तालुक्यातुन मोठ्या संख्येने शेतकरी व दिव्यांग बांधव उपस्थित राहतील असे प्रहार अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले.
या सभे सोबतच आज कासोदा व चाळीसगाव येथे देखील बच्चू कडू यांच्या सभा होणार आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments