गृहरक्षक दलाच्या जवानांच्या विविध प्रश्नांबाबत आज अमळनेर दौऱ्यावर असलेले आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले.
सर्व होमगार्ड सैनिक यांना 365 दिवस काम मिळावे. निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य कालबाह्य झाले असून त्यात बदल करावा, होमगार्ड अधिनियम 1947 यात बदल करून नवीन मसुदा तयार करून शासन निर्णय जारी करावा, होमगार्ड मध्ये सलग पाच वर्ष सेवा बजावल्यानंतर पात्र होऊन होमगार्डना पोलीस शिपाई अमलदार या पदाकरिता थेट नियुक्ती मिळावी, राज्य शासन कर्मचारी प्रमाणे सोयीसुविधा व सवलती आणि संपूर्ण विमा होमगार्ड यांना लागू करण्यात यावा, पोलीसा प्रमाणे समान काम समान वेतन मिळावे, होमगार्ड यांना राज्य कर्मचारी दर्जा प्राप्त करण्यात यावी, सेवा निवृत्त कर्मचारी यांना पेन्शन स्वरूपात दर महा 15000/- रुपये मिळावे, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन देऊन शासन दरबारी पाठपुरावा करावा म्हणून बच्चू कडू यांना बीनंती करण्यात आली.
या वेळी अमळनेर गृह रक्षक दलाचे राकेश चौधरी, गणेश लांडगे, जितेंद्र पवार, जितेंद्र महाजन, रामकृष्ण चौधरी, दत्तात्रय पाटील,भूषण शिंदे, महिला होमगार्ड वैष्णवी पाटील आदी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments