डॉ अनिल शिंदे यांचे नेतृत्वाखाली महायुतीचा निषेध मोर्चा!!
शेतकरी प्रश्न घेऊन निघालेल्या आक्रोश मोर्चाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी प्रांताधिकारी, महसूल व कृषी अधिकारी यांचे सह खा. स्मिता वाघ व आ. अनिल पाटील यांच्या बद्दल अश्लाघ्य भाषेत टीका केली.. त्याचे पसडसाद दुसऱ्या दिवशी उमटले.
महायुतीचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, रस्ता रोको करून त्यांनी उन्मेष पाटील यांचा निषेध केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून दहन करण्यात आले, पुन्हा अमळनेरात येऊन असे बोलून दाखवावे असे आव्हान देखील देण्यात आले.
या निषेध मोर्च्यात महायुतीचे नेते डॉ. अनिल शिंदे, माजी जि.प. सदस्य व्ही.आर. पाटील, माजी प.स. सभापती मीनाबाई पाटील, शाम अहिरे, प्रफुल्ल पाटील, शितल देशमुख, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, माधुरी पाटील, देवा लांडगे, शिवाजी राजपूत, योगेश पाटील, दिनेश पाटील, कमल कोचर, गौरव महाजन, राजेश पाटील, भूषण भदाणे, निलेश देशमुख, सुनील शिंपी, भरतसिंग परदेशी, दिलीप ठाकूर, राम कालोशे, शिवाजी दौलत पाटील, मुक्तार खाटीक, अख्तर तेली, सुरेश पाटील यांसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments