न.प. तसेच जि.प/पं.स निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांनो... केवळ आपल्याच मस्तीत राहून चालणार नाही... विचारपूर्वक पाऊले टाकायला हवी.. कुणालाही कमजोर समजू नये...
कारण आपण अनेक वर्षे जे स्वप्न बघत मैदानात उतरला आहात तिथे एक मत सुद्धा स्वप्नांचा चूराडा करणारे ठरू शकते...
तो काय आपल्या वार्डाचा नाही, त्याला आपल्या प्रभागात कोण ओळखते? त्याचे कोण ऐकते? अशा विचारात इग्नोर कराल तर निश्चित पश्चाताप करायची वेळ येईल..
माझे काम बोलते, माझा पैसा बोलतो, आपले सर्व सेटिंग आहे, आजच गुलाल ठरलेला आहे अशा भ्रमात राहिलात तर 'माती चाटायचीच' वेळ येणार हे आताच समजून घ्या.
कोण, कुठे, कशी तुमची 'ठासेल' याचा राजकारणात नेम नसतो.. आणि वेळ निघून गेल्यावर मग 'यार तेंव्हाच भेटून घेतले असते तर बरे झाले असते' म्हणत रडायची वेळ मात्र येते.
म्हणून कुणालाही कमजोर समजू नका.. त्यातल्या त्यात आम्हाला तर अजिबात नाही!!
कारण कोणताही प्रभाग असो, कोणतेही गाव, कोणताही मतदार संघ असो... किमान 50 मते खराब करण्याचे 'उपद्रव मूल्य' आमचेकडे नक्कीच आहे. हे कायम ध्यानात असू द्यावे.
आयत्या वेळी मॅनेज करू, रडून घेऊ, पाय पडून घेऊ... या कामचलाऊ ट्रिक आता जुन्या झाल्या आहेत.
आम्ही आपले हितचिंतक आहोत म्हणून हा प्रेमाचा सल्ला.
पटले तर जरूर स्विकारा... नक्की अंमलात आणा. झाला तर फायदा तुमचाच आहे. शुभेच्छा!!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments