अमळनेर तालुक्यातील दहीवद च्या माजी लोकनियुक्त सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक सुष्माताई वासुदेव देसले यांनी दोन्ही पदावर असताना भरीव काम करून ठसा उमटवला आहे. व्यापक जनसंपर्क असलेल्या व अभ्यासू असल्याने विकासकामांची सूत्रबद्ध सुरुवात करण्याची त्यांची हातोटी आहे,
त्यांचे पती वासुदेव देसले हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी व तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा मित्रपरिवार व नाते संबंध मोठा आहे. सर्व समाजात दोघा पतीपत्नी यांना आदराचे स्थान आहे.
अशा धडाडीने काम करणाऱ्या, शांततेने जनतेचे म्हणणे समजून घेणाऱ्या सुष्माताई यांनी आगामी जि.प. निवडणूक लढवावी म्हणून दहीवद गटातून रेटा वाढत आहे.
लोकांची इच्छा व आग्रह असल्याने आपण ही निवडणूक लढणार आहोत असे त्यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
एकूणच देसले परिवाराचा संपर्क, काम करण्याची पद्धत व नम्र स्वभाव या मुळे सुष्माताई देसले या प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments