अमळनेरच्या हितासाठीच शिवसेनेत प्रवेश! -शिरीषदादा चौधरी

पत्रकार परिषदेत आ.अनिलदादा यांच्यावरही केली टीका. 
अमळनेरच्या विकासासाठीच आपला पक्ष प्रवेश असून मंगळवार दि.१४ऑक्टोबर रोजी मा. एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत अशी माहिती माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी आपल्या पक्ष प्रवेशा मागील भूमिका सांगतानाच अतिवृष्टी व अन्य कारणे विलंब झाला असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात मा.एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत मोठा मेळावा घेऊ, आपला पक्ष प्रवेश झाला की अमळनेर मतदार संघाच्या हितासाठी एक खुशखबर  आपण देणार आहोत असेही त्यांनी सांगितले. 
विद्यमान आमदारांचे तालुक्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले असून उर्मट बोलतात, जनतेचा अपमान करतात, दोन नंबरचे धंदे बंद करणार होते पण उलट ते धंदे जोरात सुरू झाले असून अनिल पाटील यांचा वरदहस्त आहे असा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी शिरीषदादा यांच्या सोबत महेंद्र सुदाम महाजन, सुनील भामरे, बबली पाठक, समर्थक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments