१९८८ पासून सूर्यकांतशेठ भामरे व भामरे परिवाराने 'एस के ज्वेलर्स'च्या माध्यमातून सराफी व्यवसायात 'ग्राहकांच्या विश्वासास पात्र' असा ठसा उमटवला आहे. चोख व पारदर्शक व्यवहार, प्रेमळ संभाषण, उच्च दर्जा व नाविन्यपूर्ण डिझाइन अशी खासियत म्हणून एस के ज्वेलर्स चे नाव आहे.
शनिवार दि.१८ ऑक्टोबर २५ रोजी स्टेशनरोड वरील नगरपरिषदे शेजारी अत्याधुनिक असे भव्य शोरूम असलेल्या द्वितीय शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.
या प्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी व सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चोखंदळ ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला.
भामरे परिवाराचे व्यावसायिक कौशल्य, ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध या निमित्ताने ठळक दिसून आले.
भामरे परिवाराच्या या द्वितीय शाखेस देखील भरभरून मिळालेला प्रतिसाद ही त्यांच्या प्रामाणिक व विश्वसनिय परंपरेची पावती म्हणावी लागेल.
दिवंगत वडील सूर्यकांत बापू वामनशेठ भामरे यांचा आशीर्वाद व आई श्रीमती सुनीता सूर्यकांत भामरे यांचे हस्ते उद्घाटन करून या भव्य दालनाचा शुभारंभ झाला. सचिन सूर्यकांत भामरे, सौ कोमल सचिन भामरे, किंजल सचिन भामरे व भामरे परिवाराने सर्वांचे ऋण व्यक्त केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments