प्रेरणादायी कर्तृत्वाचा सन्मान सोहळा !मराठी लाईव्ह न्यूज चा आगळा-वेगळा उपक्रम!!

चमकत्या ताऱ्यांच्या सन्मानास आपली उपस्थिती हवीच! 
मराठी वेबपोर्टल मराठी लाईव्ह न्यूज या माध्यमाचा सहावा वर्धापन दिन व "सन्मान कर्तृत्वाचा २०२५ – प्रेरणा पर्व" सोहळा दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता अमळनेर येथील जुना टाऊन हॉल, साने गुरुजी वाचनालय येथे पार पडणार आहे.
     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. बी. एन. चौधरी असतील तर उद्घाटक डॉ. डिगंबर महाले यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून  कपिल पवार, वासुदेव देसले, प्रा. डॉ. जयदीप पाटील, सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. सुनील नंदवाडकर, मयूर पाटील, विलासराव पाटील, डॉ. अविनाश जोशी, विजयसिंह पवार हे असणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. अविनाश रघूराज जोशी, मयूर चंद्रकांत पाटील, प्रा. डॉ. विजय तुंटे, अनुपमा जाधव, डॉ. मनिलाल शिंपी, सुनील महाजन, दशरथ लांडगे व वसुंधरा लांडगे, डॉ. प्रसाद पाटील, शोभा शिंदे, अँड. कौस्तुभ पाटील, अँड. सारांश सोनार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व बुक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या प्रेरणादायी व गौरवशाली सोहळ्यास सर्व मित्रपरिवार, ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार, पुरस्कारार्थी बांधव-भगिनी तसेच नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन यांनी केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments