अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमळनेरात सर्वपक्षीय शोकसभा

अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमळनेरात रविवारी सर्वपक्षीय शोकसभा
​अमळनेर - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्या स्मृतींना सामूहिक अभिवादन करण्यासाठी अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
​अमळनेरच्या विकासात अजितदादांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तालुक्यातील विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी २५ वर्षांपासून येथील जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपले होते. या शोकसभेला तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, विविध कर्मचारी संघटना, महिला मंडळे, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​कार्यक्रमाचा तपशील: ​दिनांक: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ ​वेळ: सकाळी ठीक ९ वाजता ​स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments