महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामती येथे पार पडलेल्या त्यांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण अमळनेर येथे डिजिटल स्क्रीनद्वारे करण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना शेकडो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर अजितदादा पवार यांची अंत्ययात्रा सकाळी ९ वाजता काढण्यात आली. अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचे दर्शन घेता यावे, यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर भव्य डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अंत्यविधी सुरू असताना उपस्थित कार्यकर्त्यांनी 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणा दिल्या. यावेळी अनेकांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, इम्रान खाटीक, शेखर पाटील, विजय शेखनाथ पाटील. हिरालाल पाटील, शरद सोनवणे, विनोद कदम, भाऊसाहेब पाटील. शिवाजीराव पाटील, पत्रकार पांडुरंग पाटील आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अग्निडाग दिल्यानंतर सर्वांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामूहिक शांतिमंत्राद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार अनिल पाटील यांच्या भावना:
"आमचा बाप गेला..."
घटनेनंतर अत्यंत हादरलेल्या स्थितीत असलेले आमदार अनिल पाटील यांनी बारामती येथून माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली....
आज आमचा बाप गेला, आम्ही आता कोणाकडे पाहायचे? माझ्या मतदारसंघातील विकासाची एक-एक वीट अजितदादांनीच रचली होती. दर मंगळवारी ते आम्हाला बोलावून आमच्या समस्या जाणून घ्यायचे, आता आम्ही आमच्या व्यथा कोणाकडे मांडायच्या? स्वप्नातही वाटले नव्हते की नियती असा घात करेल असे आ. अनिलदादा पाटील भावुक होऊन म्हणाले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments