जमिनीची घटती सुपीकता आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या 'भूमी सुपोषण व संरक्षण' अभियानाचा देशव्यापी शुभारंभ यंदा अमळनेर येथून होणार आहे. येत्या १९ मार्च २०२६ रोजी, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत मंगळग्रह मंदिरात हा सोहळा पार पडणार आहे
अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे आणि शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीकडे वळवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागैय्याजी, कनेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, तसेच पद्मश्री सुभाषजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. देशभरातून हजारो शेतकरी व मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.
शेतकरी आणणार 'मूठभर माती'
कार्यक्रमासाठी येताना देशभरातील शेतकरी आपल्या शेतातील 'एक मूठ माती' सोबत आणतील. या मातीचे मंगळग्रह मंदिरात पूजन करून ती पुन्हा प्रसाद स्वरूपात गावोगावी वितरित केली जाईल, जेणेकरून भूमी सुपोषणाचा संदेश सर्वदूर पोहोचेल अशी माहिती डॉ डिगंबर महाले यांनी दिली.
खानदेशासाठी अभिमानाचा क्षण
"विश्वातील एकमेव भूमी मातेची मूर्ती मंगळग्रह मंदिरात आहे. मातेच्या जन्मदिनाचे (गुढीपाडवा) औचित्य साधून राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ येथून होणे, हे अमळनेर व खानदेशासाठी भाग्याचे आहे. या माध्यमातून देश सुजलाम्-सुफलाम् करण्याचा संकल्प केला जाणार आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments