वैद्यकीय क्षेत्रातील, विशेषतः त्वचा आणि केशविकार (Skin & Hair) उपचारांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक'च्या संचालिका डॉ. दिपाली कुंदन साळुंखे यांना प्रतिष्ठेच्या 'महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५' (Maharashtra Business Icon Award 2025) ने सन्मानित करण्यात आले आहे.
नाशिक येथील सोमा वाईन व्हिलेजमध्ये 'रीसील डॉट इन' (Reseal.in) या संस्थेच्या वतीने आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते डॉ. दिपाली साळुंखे यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर 'रीसील'चे सीईओ आणि संस्थापक सुधीर पाठडे उपस्थित होते.
डॉ. दिपाली साळुंखे यांनी 'तेजस स्किन अँड हेअर क्लिनिक'च्या माध्यमातून रुग्णांना दिलेल्या अत्याधुनिक सेवा आणि त्यांच्या या क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांचे पती ऍड. कुंदन साळुंखे आणि कुटुंबीय देखील उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. साळुंखे यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून आणि सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments