नगराध्यक्षांच्या तत्परतेने अंबऋषी जलशुद्धीकरण केंद्राला मिळाले 'सुरक्षा कवच'

अंबऋषी टेकडी केंद्रासाठी अत्यावश्यक सुरक्षा साहित्य प्रदान; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांची संवेदनशील दखल
​अमळनेर शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या अंबऋषी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रलंबित असलेली सुरक्षा साहित्याची मागणी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या तत्परतेमुळे पूर्ण झाली असून, त्यांनी स्वतः पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना हे साहित्य सुपूर्द केले.
अंबऋषी टेकडी जलशुद्धीकरण केंद्र हे शहराच्या पाणीपुरवठ्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने काही साहित्याची (Safety Equipment) तातडीने गरज होती, मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. ही बाब नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रशासकीय कार्यवाहीला वेग दिला.
​तडाखेबाज निर्णय आणि अंमलबजावणी
नगराध्यक्षांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. मुख्याधिकाऱ्यांनीही तात्काळ संबंधित मक्तेदारास सूचना देत अत्यंत अल्प कालावधीत सर्व साहित्य उपलब्ध करून घेतले.
कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागू नये, यासाठी विविध प्रकारचे साहित्य देण्यात आले त्यात  उंचावर काम करण्यासाठी संरक्षण म्हणून सेफ्टी हार्नेस (Safety Harness), पाण्यात बुडू नये यासाठी लाईफ जॅकेट व लाईफ रिंग, बचाव कार्यासाठी ​रबरी ट्यूब (Inflatable tubes), आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲल्युमिनियमच्या २० फूट व १५ फूट लांबीच्या मजबूत शिड्या, टॉर्च आदी साहित्य डॉ. बाविस्कर यांनी स्वतः जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन फिल्टर इन्स्पेक्टर गणेश शिंगारे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या या कृतीमुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण असून, आता फिल्टर तपासणी आणि आपत्कालीन कामे अधिक सुरक्षितपणे पार पडतील.
​यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील व नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्ती कामे आणि पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
​नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही, हा संदेश या कार्यवाहीतून स्पष्ट झाला आहे. नेतृत्वाची हीच तत्परता शहराच्या विकासाला दिशा देणारी ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments