अखिल भारतीय सफाई कामगार संघटने'च्या फलकाचे उद्घाटन

अखिल भारतीय सफाई कामगार संघटना शाखा अमळनेरच्या वतीने नगरपरिषद आवारात संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनराज चावरिया यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य सचिव संतोष थामेत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या प्रसंगी संघटनेचे खान्देश विभाग कार्याध्यक्ष दीपक हटवाल, जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश बारसे, उपजिल्हाध्यक्ष विजय मंगल तेजकर, धुळे जिल्हाध्यक्ष सोनू घारू आणि कायदेशीर सल्लागार ॲड. सलीम खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष विकास घोगले, उपतालुकाध्यक्ष तनवीर बशीर लालबेग, शहराध्यक्ष बलराम हटवाल, पवन जैधे, शहर सचिव राजेश कल्याणी, शहर उपसचिव सुनील लोट, नितीन लोहारे, संतोष संदानशिव, महेंद्र लोहारे  यांनी परिश्रम घेतले. तसेच नवल स्वामी ग्रुपचे अध्यक्ष राम कलोसे, नरेश कल्याणे, सचिन कल्याणे, राकेश कल्याणे, विजय चव्हाण, दीपक कलोसे, करण कलोसे आणि रोहित कलोसे यांच्यासह संघटनेचे इतर कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या फलक उद्घाटन सोहळ्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments