अमळनेर तालुक्यातील हेडावे जि. प. प्राथमिक शाळेत हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २३ जानेवारी रोजी जि. प .शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊ चे वाटप करण्यात आले.
कार्यसम्राट माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या कडून व त्यांचे मार्गदर्शनाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस व हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अमळनेर तालुका शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांची हितगुज साधले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, रामेश्वर सरपंच गजेंद्र जाधव, उपतालुका प्रमुख विनोद पाटील, महेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख अनिल पाटील,
ग्रामपंचायत सदस्य नाना धोंडू पाटील उमा रविंद्र पाटील, अनिता सुरेश पाटील, नाना लुकडू पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण धनराज पाटील, हभप दिलीप, सुरेश गंभीर पाटील, प्रदीप पाटील,रोहीत पाटील, भूषण पाटील, राज पाटील, अरूण पाटील, मुख्याध्यापिका संगीता लोहार, शिक्षिका उज्वला शिंदे, अंगणवाडी शिक्षिका विमलबाई ढिवरे व गावातील विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments