निष्ठेचे फळ! ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाब पाटील यांची नगरसेवक पदी निवड.

आ. शिरीषदादा चौधरींनी केला कार्यकर्त्याचा सन्मान!
​ राजकारणात निष्ठेला आणि प्रामाणिक कष्टाला अजूनही किंमत आहे, हे अमळनेरमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अमळनेर पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कुशल संघटक गुलाब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावर आज दुपारी 3 वाजता पालिका सभागृहात शिक्कामोर्तब होणार आहे अशी सूत्रांची माहिती.
मा.आ. शिरीषदादा चौधरी, डॉ. रवींद्रबापू चौधरी आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गटनेते, नगरसेवक, नगरसेविका यांनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
​गुलाब पाटील यांची ओळख एक अत्यंत कुशल संघटक, प्रभावी वक्ते आणि नम्र स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून आहे. आयुष्याची अर्ध्याहून अधिक वर्षे त्यांनी पक्षासाठी आणि संघटनेसाठी खर्ची घातली. केवळ निस्वार्थ भावनेने, कोणतीही स्वार्थी अपेक्षा न ठेवता पक्षाचे 'झेंडे उचलणारा' कार्यकर्ता ते आज 'नगरसेवक' हा त्यांचा प्रवास कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
​निष्ठा असली आणि कामात पाप नसेल, तर त्याची दखल घेतली जातेच. मित्र गुलाब पाटील यांच्या निवडीने 'आमचा गुलाब फुलला' याचा आनंद आहे. आ. शिरीषदादा चौधरी यांनी एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय दिला आहे."
​नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल गुलाब पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आमदार शिरीषदादा चौधरी व डॉ. रवींद्रबापू चौधरी, गटनेते, सर्व शिवसेना व समर्थक नगरसेवक यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
गुलाब, खूप प्रेमासह अभिनंदन. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments