रिट याचिकेवर उच्चन्यायालयात आज फैसला!!
अमळनेर खा.शि.निवडणुकीत 9/10 मतांनी पराभूत झालेले उद्योगपती कल्याण पाटील व डॉ अनिल शिंदे यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज करून त्यासाठी आवश्यक ती रक्कम देखील भरली परंतु मतपत्रिका मोजल्याच नाहीत, मोठा खर्च करूनही फोटो असलेल्या मतदार याद्या वापरल्याच नाहीत या सह मयत सभासदानी मतदान केल्याचा आक्षेप घेत थेट उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
आज न्यायालयात सुनावणी असून खाशी परिवारासह संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.
याचिका मंजूर होऊन जैसे थे असा निकाल येतो की आणखी काही आदेश होतात? की पुन्हा निवडणूक होते?
कल्याण पाटील व डॉ अनिल शिंदे यांचा अल्प मतांनी झालेला पराभव चर्चेचा विषय झाला असून या याचिकेमुळे अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
तसेच याचिका मंजूर झाल्यास फक्त फेर मतमोजणी होईल की फेर मतदान? या चर्चेला उधाण आले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments