त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षाही उंचावल्या!!
अमळनेर प्रभाग सहा मध्ये खुल्या निवडणुकीत निवडून आलेले सविता योगराज संदानशीव, दीपक चौगुले ज्या प्रभागात राहतात त्याच प्रभागातून आज मोहन सातपुते व गुलाब पाटील हे दोघे स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध विजयी झाले आहेत.
एकाच प्रभागाला चार नगरसेवक लाभल्याने या प्रभागातील नागरिकांनी सर्वाधिक जल्लोष केला. प्रभागाची कामे होतील म्हणून अपेक्षाही उंचावल्या आहेत.
माजी नगरसेवक मनोज पाटील शोधता सापडत नहोते व प्रभागाची दुर्दशा असल्याने नागरिकांचा संताप होत होता. आता मात्र चक्क 4 नगरसेवक लाभल्याने प्रलंबित कामे सोडवण्यासाठी व पुढील अडचणी बद्दल तक्रार करणे देखील सोपे होणार आहे. त्यामुळे नागरिक खुश आहेत.
विशेष म्हणजे चारही नगरसेवक सत्ताधारी गटाचे असल्याने या प्रभागास झुकते माप मिळण्याची जास्त शक्यता आहे म्हणूनच नागरिकांनी उत्स्फूर्त जल्लोष करून चौघांचे स्वागत केले आहे.
【*बातमीत प्रसिध्द फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.】
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments