22 वर्षाच्या वनवासा नंतर मिळालेले पद वादाच्या भोवऱ्यात!
आज अमळनेर नगरपरिषदेत झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध विजयी झालेले माजी नगरसेवक मोहन बाळाजी सातपुते यांचे 2003 चे प्रकरण उकरून काढत पत्रकार राजकुमार छाजेड यांनी तक्रार गुदरली आहे. 2003 ते आजअखेर म्हणजे 22 वर्षाच्या वनवासानंतर मिळालेले नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या शक्यतेची चर्चा अमळनेरात सुरू आहे.
अतिक्रमण व अवैध बांधकाम प्रकरणी नरेंद्र ठाकूर यांनी केलेल्या तक्रारी मुळे मोहन सातपुते 2003 ला अपात्र झाले होते. मात्र मोहन सातपुते यांनी अपील केल्याने हे प्रकरण उच्चन्यायालयात प्रलंबित आहे. मात्र त्यामुळे अर्बन बँकेचा अपवाद वगळता श्री सातपुते नप राजकारणापासून दूरच होते. तरीही ते नगरपरिषद निवडणूक लढले व पराभूत झाले होते हे विशेष!
तक्रारदार नरेंद्र ठाकूर हे त्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी होते व आज सातपुते हे शिवसेनेच्याच मदतीने नगरसेवक झाले. म्हणजे शिवसैनिका मुळे पद गेले व शिवसेने मुळेच पद मिळाले.. हा विचित्र योगायोग असलेला किस्साही या निमित्ताने चर्चेत आला.
विधीतज्ज्ञांच्या मते छाजेड यांच्या तक्रारीत लॉजीकली दम आहे तर आपसात झालेल्या तोंडी करारानुसार वर्षभरासाठीच सातपुते यांना ही संधी मिळाली आहे, त्यात जिल्हाधिकारी दोघांचे म्हणणे ऐकून घेतील व निर्णय देतील यात तारीख पे तारीख असा वेळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सातपुतेंना आता तरी धक्का नाही असे काहींचे मत आहे.
मात्र प्रकरण अगदी स्पष्ट असल्याने झटपट निर्णय होऊन सातपुते यांना नगरसेवकपद गमवावेच लागेल असा दावा राजकुमार छाजेड यांनी केला आहे.
मोहन सातपुते यांचेशी संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र चिंता करण्याचे कारण नाही 'मोहनभाऊ यांचे पद सहीसलामत राहील' असा विश्वास सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे.
एकूणच निवडून आल्या-आल्या तासाभरातच अपात्रतेची तक्रार दाखल झाल्याने हा विषय जोरदार चर्चेचा ठरला आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments