खा.शि.निवडणुकीची कत्तल की रात! पाकिटे वाटपाची मोहीम जोरात!!

सॉलिड साठी एक्का दुरी नव्हे थेट पंजा चा भाव?
अमळनेर खानदेश शिक्षण मंडळाची निवडणूक उद्या 4 जानेवारी रोजी होत आहे, या निवडणुकीत आशीर्वाद विरुद्ध परिवर्तन पॅनल चे 6 लोक उभे आहेत, पंकज मुंदडे, लीना पाटील, जितेंद्र झाबक असे तीन अपक्ष उमेदवार संचालक पदासाठी लढत आहेत. 
अध्यक्ष व अन्य पदांसाठी डझनभर उमेदवार देखील पायपीट करताना दिसत आहेत. 
प्रेमाची पाकिटे घेतल्या शिवाय मतदानाला जायचे नाही असा काही अपवाद वगळता सर्व मतदारांचा शिरस्ताच आहे जणू. 
त्या साठी आज शेवटच्या दिवशी पाकिटे वाटप मोहिमेस गती आली असून अनेकांचे खिसे भरत आल्याची जोरदार चर्चा आहे. 
आज रात्री उशिरापर्यंत एक दुसऱ्याची कटिंग करून शक्य होतील तितके सॉलिड मते मिळविण्यासाठी अधिक वजनाचे प्रेमळ पाकीट पोच करण्याकडे अधिक लक्ष राहील..त्यामुळे ही कत्तल की रात आहे. 
खात्रीशीर मतदार पाहून सॉलिड साठी एक्का दुरी नाही तर थेट पंजा दाखवणारे 2 उमेदवार चर्चेत आले असून त्यांच्या कडे मतदारांची धावपळ फोनाफोनी सुरू असल्याने उर्वरित देखील आपले पाकीट वजनदार करण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
आशीर्वादच्या 2 लोकांचे आजच रिटर्न तिकीट निश्चित असल्याने ते अधिक मोठे पाकीट घेऊन गयावया करीत असल्याचेही चित्र आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments