लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेल्या एकनाथराव शिंदे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, महिलांचा अनादर कदापि शक्य नाही. सदैव महिलांचा सन्मानच!
पालकमंत्री बोलले तसे विरोधक आता निमित्त शोधतील हे खरे निघाले!
राज्यात/जिल्ह्यात अनेक आमदार, मंत्री यांच्या पत्नी बिनविरोध वा मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाल्यात, अमळनेरात प्रभाग 15 मध्ये मात्र आ.अनिल पाटील यांनी खूप आटापिटा करुनही जयश्रीताई यांना कमी मताधिक्य मिळाले आणि तरीही त्यांनी आमच्या मुलांबद्दल खालच्या भाषेत टीका केली. त्याचा खुलासा करताना मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. तरीही मी मोर्चा निघण्यापूर्वीच जाहीर दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली असे सांगून आज पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे श्री चौधरी म्हणाले.
आम्ही राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेल्या ना.एकनाथराव शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत, महिलांचा अनादर कदापि करणार नाहीत.. आम्हाला अमळनेरात राजकारण करून एक तप झाले पण कधी कुणालाही अरेरावी केली नाही की कोणत्या महिलेचा अपमान केला नाही.
पण तोड मोड के जोड या पद्धतीने माझे बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून संधी साधण्यात आली. जनता हुशार आहे, त्यांना विषय लक्षात आला आहे. यापुढे आता फक्त कामावर फोकस करणार असून सत्ता गेल्याने टीका टिप्पणी होणारच हे गृहीत धरले असल्याचेही शिरीष चौधरी यांनी सांगितले.
टीका टिपणी कडे लक्ष देऊ नका... आता तुम्हाला चावण्याचा प्रकार होईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील पदग्रहण समारंभातच म्हटले होते ते खरे निघाले अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments