तर आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे सांगून शिरीष चौधरी यांनी मागितली माफी!!
अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरीं यांनी नगराध्यक्ष पद्ग्रहण सोहळ्यात आ. अनिल पाटील यांच्या पत्नीबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने अमळनेर शहरात अनिल पाटील समर्थक महिला व कार्यकर्त्यांचा प्रचंड उद्रेक झाला. असंख्य महिला, पुरुष व तरुणांच्या जमावाने पालिकेसमोर एकत्र येत शिरीष चौधरींच्या पुतळ्यास चपलांचा हार घालून पुतळादहन केले.
मोठा जमाव शिरीष चौधरींच्या स्टेशन रोडवरील निवासस्थानी धडकला याठिकाणी घोषणाबाजी करीत काहींनी चौधरी यांच्या घराच्या दिशेने बांगड्या फेकत निषेध व्यक्त केला.
आमदार पत्नीच्या अपमानाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून चौधरी यांनी आमदारांच्या पत्नीची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. प्रा. मंदाकिनी भामरे,भाजपाचे ऍड व्ही आर पाटील, भागवत पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.
आमदार अनिल पाटील उपस्थिताना संबोधित करताना म्हणाले की तालुक्यात पुन्हा एकदा विचित्र संस्कृती, व गुंडाराजचे आगमन झाल्याचे आपण यांच्या भाषणात बघितले. हेच अमळनेरला पाहिजे होते का.? असा सवाल उपस्थित केला.
तर आम्ही महिलांचा कदापि अनादर करीत नाही, ती आमची संस्कृती नाही. आपल्या वाक्याचा गैर अर्थ लावून आपली बदनामी केली जात असली तरी आपल्या भाषणामुळे कुणाचेही मन दुखावले असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे मा. आ.शिरीष चौधरी यांनी एक व्हिडिओ जारी करून सांगितले.
एकूणच नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच अमळनेरात मोर्चा निघाल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments